
सांगवी/सोमंथळी : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेवर राज्य सरकारच्या वतीने स्थगिती देण्यात आलेली होती. त्यानंतर कारखान्यावर प्रशासक नेमावा, अशी मागणी याचिकाकर्ते विश्वासराव भोसले यांनी राज्य सरकारकडे केलेली होती.
त्यानुसार श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक म्हणून फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी दिली.