सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे ‘साताऱ्या’ला कौतुक

नाबार्ड यांच्या धोरणानुसार सातारा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बँकेस भेट दिली
Kokan
Kokansakal
Updated on

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय केलेले कामकाज, उच्च दर्जाच्या डिजिटल बँकिंग सुविधा, अद्यावत डाटा सेंटर, शेतकरी, ग्राहक, व्यावसायीक, महिला यांना दिलेल्या कर्ज सुविधा, जिल्ह्याच्या विकासातील योगदान या सर्वामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक अव्वल असल्याचे कौतुक सातारा जिल्हा बँकेने केले आहे. ते आमच्यासाठी प्रेरणादायी असल्याचे मत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केले.

सातारा जिल्हा बँकेच्या १३ अधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयाला भेट दिली. या दौऱ्याबाबत बँकेचे कौतुक करत तसे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांना पाठवले आहे. नाबार्ड यांच्या धोरणानुसार सातारा बँकेच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बँकेस भेट दिली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात बँकेने उल्लेखनिय कामकाज केलेले आहे. जिल्ह्यातील शेतकरी ग्राहक, व्यवसाईक आणि महिलांना उपलब्ध करून देत असलेल्या कर्ज सुविधा उल्लेखनीय आहेत.

बँकेच्या मनुष्यबळाचा कौशल्याने वापर करून मनुष्यबळ संसाधन विकसनात केलेले कामकाज अत्यंत प्रशंसनिय आहे. बँकेच्या सर्वांगीण कामकाज पद्धतीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासात बँकेचे योगदान महत्त्‍वपूर्ण आहे. बँकेच्या विविध योजना आरबीआय व नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँक देशातील सहकारीच नव्हे तर सवर्च बँकांसाठी एक आदर्श बँक आहे.

बँकेच्या उल्लेखनीय प्रगतीमध्ये बँकेचे संचालक मंडळाचे मार्गदर्शन, अधिकारी व कर्मचारी वर्गाची कामकाज पद्धती महत्त्‍वाची ठरली आहे. बँकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, मुख्यकार्यकारी अधिकारी, संपूर्ण अधिकारी वर्गाने सातारा बँक अधिकाऱ्यांना जे मार्गदर्शन केले ते सातारा जिल्हा बँकेच्या प्रगतीमध्ये निश्चितच उपयुक्त ठरेल, अशा प्रकारचे कौतुक करणारे पत्र जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांना पाठवले आहे.

दर्जेदार सुविधा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे डाटा सेंटर अत्यंत अद्यावत असून सुरक्षा उपाय योजनांची पूर्णतः अंमलबजावणी केली आहे. ग्राहकांना एटीएम, मोबाइल बँकींग, युपीआय सुविधा देत असून बँकेच्या डिजीटल बँकींग सुविधा व्यापारी बँकेच्या दर्जाच्या आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rural Girl Reaches New Heights; Sai Patil Earns Prestigious Position in Air Force
Tourism and Connectivity Boost: Iconic Cable-Stayed Bridge to Open After Monsoon
Two 17-Year-Old Students Die in Hit-and-Run Accident Near Shirwal
Indefinite Dharna by Tarali Dam Victims; Administration Faces Growing Pressure
Marathi News Esakal
www.esakal.com