साताऱ्यात सहा वाहनांचा विचित्र अपघात; दोघे ठार, तिघे जखमी

सातारहून पुण्याकडे जाताना शिरवळजवळील धनगरवाडी हद्दीतील निप्रो कंपनीजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला.
सातारहून पुण्याकडे जाताना शिरवळजवळील धनगरवाडी हद्दीतील निप्रो कंपनीजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला.सकाळ

सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर (Pune-Banglore Highway) सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना आज मंगळवारी (ता.तीन) रात्री साडेआठ वाजता घडली. ही घटना शिरवळ-धनगरवाडी (मोटेवस्ती) हद्दीत घडली आहे. यात दोघांचा जागीच मृत्यू, तर तीन जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे (Accident In Satara) राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक थांबली होती. घटनेची माहिती मिळताच खंडाळा पोलिस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. धनरवाडी येथील युवकाने ट्रॅक्टरच्या मदतीने वाहने बाजूला केली. कारमधील मृतांना बाहेर काढण्यात आले. तसेच इतर दोन वाहनांमधील पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सातारहून पुण्याकडे जाताना शिरवळजवळील धनगरवाडी हद्दीतील निप्रो कंपनीजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला.
ऑलिम्पियन प्रवीण जाधवचं कुटुंब सातारा जिल्हा सोडणार

सदरील घटनेविषयी सविस्तर माहिती अशी, की सातारहून पुण्याकडे जाताना शिरवळजवळील धनगरवाडी हद्दीतील निप्रो कंपनीजवळ सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला. पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्याकडे जाताना सर्व्हिस रस्त्यावर वाहने धिम्म्या गतीने धावत आहेत. भरधाव वेगामुळे सदरील अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतांची कोळकर व कुलकर्णी असे आडनाव सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com