
सातारा : जिल्हा कारागृहातील बंदिवानांना रक्ताचे नातेवाइक व वकिलांशी बोलण्यासाठी जिल्हा कारागृहात ॲलन स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून बंदिवानांना आठवड्यातून तीन वेळा प्रत्येकी दहा मिनिटे बोलता येणार असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी दिली आहे.