राजेंच्या कार्याचे शंभर टक्के काैतुक तेव्हाच : राजेंद्र चोरगे

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 9 September 2020

आता सातारकरांनी आपलं शहर केवळ आकाराने नव्हे तर सर्वांगीणदृष्ट्या मोठे करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन चोरगे यांनी केले आहे.

सातारा : सातारा शहराची हद्दवाढीच्या अधिसूचना मंगळवारी (ता.8) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांच्याकडे सुपुर्द केली. हद्दवाढीची बातमी सातारा शहरात पसरताच दिवसभर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण हाेते. अनेकांनी हद्दवाढीच्या निर्णयाचे स्वागत केले. काहींनी आपला भाग शहरात समाविष्ट झाला का याची विचारणा देखील पालिकेत करण्यास प्रारंभ केला.
साताऱ्याच्या हद्दवाढीस अजित पवारांचाच हात; आता हवे महापालिकेचे लक्ष

सातारच्या बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी देखील खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांचे अभिनंदन केले. चाेरगे म्हणाले, हद्दवाढ होणे भौगोलिकदृष्ट्या आणि लोकसंख्येच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धन्यवाद, तर त्यासाठी प्रयत्न करणारे खासदार उदयनराजे व आमदार शिवेंद्रराजे भोसले या दोघांचे 25-25 टक्के अभिनंदन करतो.

औरंगाबादहून दिल्लीसाठी आता १५ सप्टेंबरपासून दररोज विमानसेवा 

काळजाला भिडतेय स्मशानातील माया  

सध्या केवळ 50 टक्के यश आले, असे म्हणता येईल. सर्वांना नागरी सुविधा योग्य करात चांगल्या मिळतील, तेव्हाच 100 टक्के यश आले, असे म्हणता येईल. दोन्ही राजेंच्या माध्यमातून शहराचा गतीने विकास व्हावा, हीच नागरिकांची इच्छा आहे. त्यांच्या प्रयत्नाला यश आल्यानंतरच हद्दवाढीचे 100 टक्के अभिनंदन करेन. आता सातारकरांनी आपलं शहर केवळ आकाराने नव्हे तर सर्वांगीणदृष्ट्या मोठे करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन चोरगे यांनी केले आहे.

अंत्यसंस्कारासाठी स्माशनभूमीत जाण्यापुर्वी हे वाचा...

प्रियजनांचे अंत्यदर्शन जगाच्या कानाकोपर्‍यातुन होण्यासाठी 'या' ट्रस्टचा पुढाकार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Social Worker Rajendra Chorge Congrulates Udayanraje Shivendrasinghraje Bhosale Satara News