esakal | वारकरी सांप्रदायातील काही मंडळी मानधनापासून 'वंचित'
sakal

बोलून बातमी शोधा

satara

वारकरी सांप्रदायातील काही मंडळी मानधनापासून 'वंचित'

sakal_logo
By
भद्रेश भाटे

वाई (सातारा) : महाराष्ट्र शासनाने वारकरी कलाकारांना आर्थिक मदत म्हणून पाच हजार रुपये देण्याचे मान्य केले आहे. परंतु, वारकरी सांप्रदायातील काही मंडळी या मानधनापासून वंचित आहेत. कोरोनाच्या काळात सर्वजण परिस्थितीने त्रस्त असून, वारकरी कलाकारांमध्ये सर्वांनाच आर्थिक मदतीची गरज आहे. तरी शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून कलाकारांना मानधनासह विविध सुविधा द्याव्यात, अशा मागणीचे लेखी निवेदन वाई तालुका वारकरी परिषदेच्या वतीने तहसीलदार रणजित भोसले यांच्याकडे देण्यात आले.

वाई तालुक्यात अनेक वारकरी, कीर्तनकार, प्रवचनकार, भारुडकार, मृदंग वादक, गायक, भजनी इत्यादी कलाकार आहेत. वारकरी सांप्रदाय हा समाजाला नेहमी वेगळी दिशा देण्याचे काम करीत असतो. त्यांनाही पाच हजार रुपये मानधन, वैद्यकीय सुविधा, एसटी प्रवासात सवलत, पेन्शन योजना लागू करण्यात यावी, तरच हा कलाकार वर्ग योग्य पद्धतीने समाजप्रबोधनाचे कार्य करेल.

हेही वाचा: पुणे : कंपनीचे तीन कोटी ६८ लाख स्वतःच्या खात्यात वळविले

तरी शासनाने मान्य केलेले मानधन देऊन कलाकारांप्रती असणारी स्नेहभावना वृद्धींगत करावी, अशा आशयाचे निवेदन वाई तालुका वारकरी साहित्य परिषदेने दिले आहे. त्यावर वारकरी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अशोकबुवा पाटणे, सचिव राजेंद्र शिंदे, भरत बागल, बबन सपकाळ, तुकाराम निगडे, बाजीराव नवघणे, शिवाजी चव्हाण, रामचंद्र चिकणे, रामभाऊ तुपे, धर्माजी भोसले, मानसिंग भोसले, हणमंत शिंदे, दत्तात्रय पवार, तानाजी नवले, राजेंद्र चिकणे, बाबूराव कदम, आनंदराव पाटील, शिवाजी गाढवे, गुलाब रोकडे आदींच्या सह्या आहेत.

loading image
go to top