killed
sakal
कऱ्हाड - कौटुंबिक वादातून डोक्यात स्टूल घातल्याने धनाजी सत्यवान अदलिंगे याचा मृत्यू झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्यातील गोळेश्वर येथे घडली. मृत्यूनंतर पुरावा लपविण्याच्या उद्देशाने मृतदेह सोनसळ घाटात तो फेकून दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी मृताची आई, वडील आणि भाऊ यांना पोलिसांनी अटक केली आहे.