21 वं शतक अन् 21 वा दिवस; वाचा आजचा दिवस कसा आहे प्रत्येकासाठी खास.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

special day today

21 वं शतक अन् 21 वा दिवस; वाचा आजचा दिवस कसा आहे प्रत्येकासाठी खास..

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : सध्या जगावर कोरोना महामारीचं (coronavirus) संकट उभं ठाकलं आहे, या महामारीतून सुटण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या पातळीवर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ही महामारी कधी एकदा संपतेय, अशी प्रत्येकाचीच गत झालीय. या संकटकाळात प्रत्येकजण आपला जीव वाचावा यासाठी धडपडतोय, तर काहींकडून एखाद्याचं कुटुंब या महामारीतून उद्धवस्त होण्यापासून वाचावं, यासाठी जीवओतून प्रामाणिकपणे कोरोनाशी लढतोय. हे सगळं सांगण्याचं कारण हे की, आज जरी जगावर कोरोनाचं संकट ओढावलं असलं तरी, प्रत्येकजण या संकटात जगण्याची वाट शोधताना दिसतोय, कॅलेंडरची पानं जसजसी पलटताहेत, तसेच दिवसामागून चांगले-वाईट दिवस येतच आहेत, कधीतरी हे संकट जाईल या आशेवर अनेकजण जीवनाची पुढील दिशाही ठरवताना दिसत आहेत. आजचा 21 वा दिवस, 21 वा आठवडा आणि 21 व्या शतकातील 21 वं वर्ष! (special-day-today-21st-day-21st-week-21st-year-of-the-21st-century)

यापूर्वी देखील कोरोनापेक्षा महाभयंकर संकटं आली, पण माणूस कधीच खचून गेला नाही, उलट ताठ मानेनं संकटाशी सामना करुन त्यानं संकटांना माघारी परतवून लावलं. आजच्या 21 व्या शतकात या कोरोना महामारीनं जगाला ग्रासलंय. आजचा 21 वा दिवस, 21 वा आठवडा आणि 21 व्या शतकातील 21 वं वर्ष! बर्‍याच वर्षांत एकदा अशी तारीख येते, जी बाकीच्यांपेक्षा वेगळी असते. कारण, शेकडो वर्षांतून एकदा असं घडत असतं. त्यामुळे दिवसाच्या तारखेच्या विशिष्टतेबद्दल नेटिझन्स खूप उत्साही दिसत आहेत. व्हाॅटसअॅप, फेसबुक, इस्टाग्रामच्या माध्यमातून अनेकांना या दिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. एकंदरीत, जगावर कोरोनाचं संकट असलं तरी अनेकांनी हा दिवस आपल्या खास शैलीत सेलिब्रेशन केला. शंभर वर्षांतून एकदा येणारा हा दिवस, लाॅकडाउनच्या काळातही अनेकांनी तो अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न केला. आयुष्यातली संकटं झटकून पुन्हा नव्या दमाने उभारी घेण्यासाठी हा दिवस अनेकांसाठी प्रेरणा देणारा देखील ठरला आहे. त्यामुळे काहींसाठी हा दिवस खास असला, तरी कोरोना महामारीमुळे काहींसाठी हा दिवस निराशेचा ठरत आहे.

भारतातल्या 'या' रहस्यमय गुहा, ज्यात दडलाय प्राचीन 'इतिहास'; पाहा अचंबित करणारे Photos

special day today 21st day 21st week 21st year of the 21st century

loading image
go to top