
सातारा : अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदापासून ऑनलाइन केल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. ऑगस्ट महिन्याचा मध्य उजाडला तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता या प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक आले असून, उद्या (गुरुवारी) होणाऱ्या विशेष फेरीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोर्टलवर रिक्त जागा निश्चित होणार आहेत. १९ ऑगस्टला एक वाजल्यापासून ते २० ऑगस्टला सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे.