माणसं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते हाच विलासकाकांचा हाेता श्वास !

माणसं आणि जीवाभावाचे कार्यकर्ते हाच विलासकाकांचा हाेता श्वास !

सातारा : कॉंग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या सातारा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत तयार झालेल्या विलासराव पाटील उंडाळकर यांनी आपल्या वेगळ्या राजकारणाने इतर अनेक नेत्यांपेक्षाही आपली प्रतिमा वेगळीच ठेवली. जपली. राजकारणातून कॉंग्रेसी विचारांची धुरा पुढे नेण्यासाठी त्यांनी सातत्य ठेवले. जिल्हा परिषदेच्या सभागृहापासून विधीमंडळाच्या सभागृहापर्यंत ते राजकारणातील 'काका' म्हणून वावरले. 'काका' या नावालाच त्यांनी एक दबदबा मिळवून दिला. मोबाईल सारखे उपकरण त्याकाळी नव्हते. त्यामुळे निरोप पोचविण्यासाठी नेटवर्कचा जमाना नसलेल्या काळातही काकांचे कार्यकर्ते बरोबर त्यांच्यापाशी जाऊन निरोप द्यायचे. राजकारणात कार्यकर्ते हेच काकांचे नेटवर्क (जाळे) होते. ते त्यांनी आयुष्यभर जपले. कार्यकर्त्यांनी देखील त्यांच्यावर अमाप प्रेम करीत असतं.

जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रा. उत्तमराव माने यांनी काकांविषयीची आठवण सांगताना लोकांशी संपर्कात राहणे हा जणू त्यांचा छंदच हाेता असे नमूद केले. प्रा. माने म्हणाले काका लहान मोठ्या कार्यकर्त्यांना पाठबळ देत असे. त्यामुळेच जिल्ह्याच्या सर्वच भागात त्यांच्या अवतीभवती कार्यकर्त्यांची फळी वाढत गेली. फक्त निवडणुकीपुरताच संपर्क असे त्यांचे समीकरण काकांचे कधीच नव्हते. काकांच्या राजकीय प्रसंगाविषयी बाेलताना प्रा. माने म्हणाले हाेय तुम्ही म्हणत आहात ते खरे आहे त्याकाळी मोबाईलची सुविधा नव्हती. तरीही काकांजवळ जो निरोप द्यायचा आहे तो बरोबर त्यांच्यापाशीच पोहचत असे. कार्यकर्त्यांची काकांवर फार निष्ठा. काकांनी देखील कार्यकर्त्यांवर विश्‍वास ठेऊन त्यांना राजकारणातल्या संधी दिल्या. मोठे केले. 

विलासकाका म्हणजे, ध्येयवादी, पुरोगामी, प्रगतशील, प्रबाेधनाचा वारसा जपणारे नेतृत्व; मान्यवरांची भावना 

आमची 40 वर्षांपासूनची मैत्री. काका म्हणजे मैत्री जपणारे, परखड बोलणारे व्यक्तिमत्व. त्यांच्या निधनाने एक दुवा निखळला आहे असे ज्येष्ठ कर सल्लागार अरुण गाेडबाेले यांनी नमूद केले. ते म्हणाले, सलग पस्तीस वर्षे कराड दक्षिणचे प्रतिनिधित्व करणारे, सलग पंचवीस वर्षे जिल्ह्यातील सर्व अग्रणी संस्थांवर आपल्या कुशल आणि निरपेक्ष सक्षम नेतृत्वाने अंकुश ठेवणारे, सलग बारा वर्षे विविध खात्याचे सक्षम मंत्री म्हणुन राज्य सरकारमध्ये आपले वेगळे अस्तित्व ठेवणारे, अनेक सहकारी संस्थांची उभारणी करणारे, तळागाळातल्यांसाठी झटणारे, पुरोगामी विचाराचे ज्येष्ठ नेते म्हणुन राज्यात ओळख असणारे विलासकाका हे नेहमी साता-याला आले की  
तांदूळ आळीत यायचे. तेथे सर्व मित्रांचा गप्पांचा फड रंगत असे. मंत्री पद अथवा सत्ता स्थानावर गेले तरी त्याच्या दिनक्रमात काेणत्याही बदल झालेला नाही. मैत्री कशी जपावी हे अनेकांनी काकांकडून शिकले असेही गाेडबाेलेंनी नमूद केले.

सलग सात वेळा आमदार राहिलेल्या विलासकाकांचा असा झाला राजकीय प्रवास

श्री शिवाजी उदय मंडळाचे ज्येष्ठ सदस्य खंडूजी कदम हे काकांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याविषयी भरभरुन बोलले. ते म्हणाले, काका शिस्तप्रिय होते. श्री शिवाजी उदय मंडळाचे अध्यक्ष बबनराव (आण्णा) उथळे आणि ते नेहमी साता-याच्या क्रीडा क्षेत्रासाठी झटत. काका आमच्या मंडळाचे सल्लागार होते. काका स्वतः दररोज नित्यनेमाने व्यायाम करीत. त्यांचा चालण्याचा नित्यक्रम अखेरपर्यंत सुरुच होता. काकांचे फटकळ बोलणे हे त्यांचे जनतेसाठी काम करून घेण्याचे एक (स्वभाव) कौशल्यच म्हणावे लागेल. श्री शिवाजी उदय मंडळ, आण्णा आणि काका हे एक अतुट नातेच म्हणावे लागेल. श्री शिवाजी उदय मंडळाच्या गुरुवर्य बबनरावजी उथळे क्रीडा व सांस्कृतिक संकुल नूतन इमारतीचे उदघाटन माजी मुख्यमंत्री (कै.) विलासराव देशमुख यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2002 मध्ये झाले. त्यावेळी विलासकाकांनी कार्यक्रमांसाठी पुढाकार घेतला होता. मंडळातील खेळाडूंना ते नेहमी प्रोत्साहन देत.

काकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते कुटुंबासमवेत खूप कमी राहिले आणि जनतेत जास्त. त्यांच्यासाठी कार्यकर्ते, जनता हेच कुटुंब हाेते. त्यांना कधीच खिशात हात घालावा लागला नाही. मुंबईपर्यंत जाताना त्यांचे गावाेगावचे कार्यकर्तेच त्यांना जेवण, नाष्टा काहीही असाे खर्च करायचे, इतका लाेकसंग्रह त्यांचा हाेता असेही कदम यांनी नमूद केले.

काकांनी उदयनराजेंना राजकारणातील हिरो बनविले 

राजकारणापेक्षा समाजकारणाला स्थान देत विलासकाकांनी जनमाणसात आपले अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांच्या या कार्यपध्दतीमुळे काका आमच्यासह सर्वसामान्यांना मोठा आधार वाटत. चांगल्या आणि वाईट वेळेत काका नेहमी सर्वसामान्य कार्यकत्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत. कोणतेही काम असो, ते घेवून गेलेल्या सर्वसामान्य माणसासाठी काका काळवेळ न बघता धावून जात. सर्वसामान्यांचा हा आधारवड काळाने हिरावून घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते पोरके झाले आहेत असे राजन चिपळूणकर यांनी नमूद केले.

गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; भाविकांसाठी दाेन दिवस राहणार मंदिर बंद 

आमचा आणि काकांचा 1978 सालापासून स्नेहसंबंध होते. गोरगरीबांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या आणि जातीयवादाला थारा न देणाऱ्या काकांच्या या स्वभावामुळे आम्ही त्यांच्याशी एकरुप झालो. कोणतेही काम असो आम्ही ते घेवून काकांकडे गेलो कि ते मार्गी लागत असे. सर्वसामान्य जनतेशी काकांची नाळ जुळली होती. गोरगरीब कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम काकांनी तहह्यात केले. त्यांच्या निधनामुळे कऱ्हाड दक्षिण पर्यायाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे रफिक बागवान यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com