गोंदवल्यात 'राम नवमी'च्या थेट प्रक्षेपणावर कोरोना 'संकट'

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदवल्यातील श्रीराम मंदिरात होणारा श्रीराम जन्मोत्सव यंदाही साधेपणाने करण्यात येणार आहे.
Srirama Navami
Srirama NavamiSrirama Navami
Updated on

गोंदवले (सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गोंदवल्यातील थोरले श्रीराम मंदिरात होणारा श्रीराम जन्मोत्सव यंदाही साधेपणाने करण्यात येणार आहे. भाविकांनीही हा सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर समितीने केले आहे. "श्रीं'च्या समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते गुढी उभारून श्रीराम नवमीच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली.

श्रीरामभक्त श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी गोंदवल्यात श्रीराम मंदिरे स्थापिले आहेत. ही मंदिरे भाविकांची विशेष श्रद्धास्थाने असल्याने येथे दर वर्षी मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या श्रीराम नवमी उत्सवात भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी असते. गोंदवल्याची वार्षिक यात्रा म्हणून या उत्सवाची ओळख आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. सध्या गोंदवल्यातील समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने समाधी मंदिरात केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीत विश्वस्तांच्या हस्ते धार्मिक कार्यक्रम पार पडले.

सकाळी गुढी उभारून श्रीराम नवमीच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली. येथील थोरले श्रीराम मंदिरात विधिवत पूजन करून अखंड नामस्मरण व पहारा बसविण्यात आला. या वेळी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. येत्या 21 एप्रिलला (बुधवार) श्रीराम जन्मोत्सव साजरा होणार आहे. मात्र, यंदाही हा सोहळा भाविकांविनाच करावा लागणार आहे. दरम्यान, सुरू झालेल्या या सोहळ्यात केवळ पुजाऱ्यांच्या उपस्थितीतच धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातील. भाविकांनी आपापल्या घरीच श्रीरामनवमीचा सोहळा साजरा करावा, असे आवाहन समाधी मंदिर समितीने केले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Lost as Heavy Winds Rip Off Shed Sheets, Sugar Stock Damaged by Rain
Karad Nandalapur flyover completion update
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
Marathi News Esakal
www.esakal.com