

Koregaon women’s wrestling tournament
Sakal
कोरेगाव : येथील हुतात्मा स्मारकात आयोजित जिजाऊ केसरी महिलांच्या कुस्त्यांच्या मैदानातील खुल्या गटातील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पिराचीवाडी- वाळव्याच्या (कोल्हापूर) सृष्टी भोसलेने कऱ्हाडच्या वेदांतिका पवारवर गुणांनी मात केली. यात प्रथम क्रमांकाच्या रोख ११ हजार रुपये बक्षिसासह जिजाऊ केसरी किताब तथा मानाची गदा पटकावली.