esakal | SSC Result 2021 : साताऱ्याचा 99.92 निकाल; जिल्ह्यात मुलींची बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra SSC result 2021

राज्‍य शासनाने जाहीर केलेल्‍या गुणनिकषांच्‍या आधारे आज राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्‍या वतीने इयत्ता दहावीचा निकाल जाहीर करण्‍यात आला.

SSC Result 2021 : साताऱ्याचा 99.92 निकाल; जिल्ह्यात मुलींची बाजी

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : राज्‍य शासनाने (Maharashtra Government) जाहीर केलेल्‍या गुणनिकषांच्‍या आधारे आज राज्‍य माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शिक्षण मंडळाच्‍या वतीने (Maharashtra State Board Of Secondary And Higher Secondary Education) इयत्ता दहावीचा निकाल (SSC Result 2021 Maharashtra Board) जाहीर करण्‍यात आला असून सातारा जिल्‍ह्याचा निकाल 99.92 टक्के इतका लागला आहे. उत्तीर्ण होण्‍यामध्‍ये मुलींनी बाजी मारली असून गतवर्षीच्‍या निकालाच्‍या तुलनेत यंदाच्‍या निकालात 2.28 टक्के वाढ झाल्‍याची माहिती सातारा जिल्‍हा परिषदेच्‍या माध्‍यमिक विभागाच्‍यावतीने देण्‍यात आली. (SSC Result 2021 99.92 Percent Result Of Satara District In 10th Examination Education News bam92)

यंदाची दहावी परीक्षा ही 9 वीचा अंतिम निकाल, इयत्ता 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमापन व इयत्ता दहावीची अंतिम तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक, मूल्यमापन आदींच्या आधारावर सदर निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांची विषयनिहाय गुण माध्यमिक शाळांतर्फे निश्चित करण्यात आले. सदर मूल्यमापन वस्तुनिष्ठ होण्यासाठी शाळा स्तरावर शासन निर्णयानुसार, निकाल समितीचे गठन करून त्यांना विषय शिक्षक व वर्ग शिक्षकांनी केलेल्या मूल्यमापनाची परीक्षण व नियमन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

हेही वाचा: नोकरीची संधी! NABARD मध्ये 162 जागांसाठी लवकरच भरती

यावर्षी सातारा जिल्ह्यात 40 हजार 166 व 1501 रिपिटर अशा एकूण 41,667 विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 40,134 विद्यार्थी हे यंदा उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 2.28 इतकी निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूरचे सचिव देविदास कुलाळ व सातारा शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली आहे.

SSC Result 2021 99.92 Percent Result Of Satara District In 10th Examination Education News bam92

loading image