

Koregaon Office Faces Crisis as Employees Resign, Work Delayed
sakal
-पांडुरंग बर्गे
कोरेगाव: तालुका भूमी अभिलेख तथा मोजणी कार्यालयातील उपअधीक्षकांसह मंजूर २० पैकी उपअधीक्षकांसह ११ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे या कार्यालयात वर्षभरात नव्याने नियुक्ती होऊन दाखल झालेल्या तब्बल दहापैकी आठ कर्मचाऱ्यांनी राजीनामा देत अन्य पर्याय शोधले आहेत, तर वर्ग दोनच्या एका अधिकाऱ्यासह वर्ग तीनमधील तीन कर्मचारी अशा तब्बल चार जणांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. परिणामी, नागरिकांच्या कामांचा खोळंबा होत असून, कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामांचा निपटारा करण्याचा ताण येत आहे.