esakal | चांगल्या पिढ्या घडवण्यात अंगणवाड्यांचं मोठं योगदान; काँग्रेसच्या सरचिटणीसांकडून कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

Udaysingh Patil-Undalkar

कोरोना काळात सेविका, मदतनिस यांनी खूप चांगले काम केले आहे.

चांगल्या पिढ्या घडवण्यात अंगणवाड्यांचं मोठं योगदान

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : पोषण आहाराच्या माध्यमातून सुदृढ व आरोग्यदायी पिढी घडवण्यात अंगणवाड्यांचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार जिल्हा परिषद सदस्य व काँग्रेसचे सरचिटणीस अ‍ॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांनी काढले. कऱ्हाड येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने राष्ट्रीय पोषण अभियानाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मंगल गलांडे, पंचायत समिती सदस्य देवराज पाटील, रमेश चव्हाण, अ‍ॅड. शरद पोळ, अर्चना गायकवाड, जयश्री जाधव, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे आदी उपस्थित होते. अ‍ॅड. पाटील म्हणाले, ज्येष्ठ नेत यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निर्मिती केल्यामुळे शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहचल्या आहेत.

हेही वाचा: कऱ्हाडला झोपडपट्यांचे निर्मूलन फसलेलेच!

सभापती जगदाळे म्हणाले, शासनाने सुरू केलेले पोषण अभियान गावागात प्रभावीपणे राबविण्यासाठी अंगणवाडीताईंनी प्रयत्न करावेत. कोरोना काळात सेविका, मदतनिस यांनी खूप चांगले काम केले आहे. याच पध्दतीने कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करावेत. सभापती ताटे म्हणाले, पंचायत समितीच्या माध्यमातून शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. वाडीवस्तीवर पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचा लाभ पोहचविण्यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी, अधिकारी प्रयत्नशील आहेत. पोषण आहार अभियानही कऱ्हाड तालुक्यात यशस्वी होईल. रमेश चव्हाण, गटविकास अधिकारी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकल्प अधिकारी सुप्रिया पोवार व सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रतिभा लोंढे यांनी स्वागत केले. अलका शेवाळे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. शरद पोळ यांनी आभार मानले.

loading image
go to top