esakal | कऱ्हाडला झोपडपट्यांचे निर्मूलन फसलेलेच! झोपडट्टीधारकांचा फक्त राजकारणासाठी वापर
sakal

बोलून बातमी शोधा

Karad Municipality

ईदगाह मैदानापासून कार्वे नाक्याकडे जाणारी वस्ती, दरवेशी वस्तीचा काही भाग अशा अनेक ठिकाणी झोपड्या आहेत.

कऱ्हाडला झोपडपट्यांचे निर्मूलन फसलेलेच!

sakal_logo
By
सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : स्वच्छ सर्वेक्षणात (Clean Survey 2021) देशात पहिला क्रमांक पटकविण्यासह माझी वसुंधरामध्ये अव्वल राहणाऱ्या कऱ्हाड शहरातील (Karad City) झोपडपट्यांचे निर्मूलन व पुनर्वसनाचा प्रयत्न फसलेला आहे. पुनर्वसन होत नाही, त्यामुळे झोपडपट्टीधारकांना दिली जाणारी आश्वासने केवळ राजकारणासाठीचे असतात, असेच म्हणावे लागणार आहे.

शहरात पाटण कॉलनी, कोयना पूल, रुक्मिणीनगर, बारा डबरी परिसर, स्टेडियमचा परिसर, रत्नागिरी गोदामाचा भाग, ईदगाह मैदानापासून कार्वे नाक्याकडे जाणारी वस्ती, दरवेशी वस्तीचा काही भाग अशा अनेक ठिकाणी झोपड्या आहेत. त्यात वाढीव हद्दीत तीन ठिकाणी तब्बल ४०० कुटुंबांची झोपडपट्टी आहे. त्यांना एकाच ठिकाणी घरे देण्यासाठी पालिकेने आराखडा आखला होता. तोही आराखडा केवळ कागदावरच रंगला होता. शहरातील १५२ झोपडपट्टीधारकांना घरे दिली जाणार होती. तोही पालिकेचा प्रयत्न अयशस्वी झाल्याचेच वास्तव आहे. शहरापेक्षाही आता वाढीव हद्दीच्या अनेक भागांत वाढणारी अनधिकृत झोपडपट्टी आता शहरासाठी धोकादायक ठरताना दिसते आहे. त्यांना मूलभूत सुविधा दिल्या जात आहेत. त्यासाठी मतांचे राजकारणातून पालिकेवर दबाव आणला जातो आहे, असाही आरोप होतो आहे. मात्र, असुविधांच्या गर्तेतील त्या भागातील झोपडपट्टीधारक मात्र पुनर्वसनाची मागणी करताना दिसत आहेत. शहरात वाढते नागरीकरण, मोठ्या इमारती, स्वच्छतेत अव्वलपणा आदी सगळ्यांसाठी आता झोपडपट्ट्यांची अडचण होताना दिसते आहे. त्यामुळे झोपडपट्ट्यांच्या निर्मूलन याहीवेळी पालिकेच्या निवडणुकीतील कळीचा मुद्दा ठरणार आहे.

हेही वाचा: माणच्या उपसभापती पदी नितीन राजगे; धनगर समाजाला प्रथमच संधी

वाढीव हद्दीसह मूळ शहरातील पाचपेक्षा जास्त ठिकाणी झोपड्या वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी आहेत, किंबहुना तेथे त्या झोपड्यांच्या विस्तारच होतो आहे. यापूर्वी शहरातील दोन ठिकाणी झोपड्यांच्या निर्मूलनाचा प्रयत्न झाला. मात्र, पालिका आणि झोपडपट्टीधारकांमध्ये समन्वय नसल्याने तोही फसलेलाच प्रयत्न आहे. काही झोपडपट्टीधारकांना मंजूर घरे पसंत नसल्याने त्यांनी झोपडपट्टीची जागा सोडलेलेली नाही, काहींनी घरे बांधण्यास घेतली आहे, मात्र शासनाकडून अनुदान थटले आहे. अनेक पिढ्यांपासून वसलेल्या झोपडपट्या पालिकेच्या विकासाच्या प्रक्रियेत कधीच दिसल्या नाहीत. परिणामी त्यांचे जीणे खालावल्यासारखेच आहे. पालिका आणि तत्सम यंत्रणा त्यांना अतिक्रमणीत म्हणून जाहीर करते, इतकाच काय तो सोपस्कार होतो. त्यामुळे पालिकेची झोपडपट्टी पुनर्वसन योजना कोलमडलेलीच दिसते.

हेही वाचा: कास पठार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; जनजीवन गारठलं

एकमेव यशस्वी... १९९६ मधील पुनर्वसन

येथील बस स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाच्या रस्त्यावर जेथून बस ये- जा करते. तेथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी होती. त्यांचे तत्कालीन पालिकेने पुनर्वसन केले. तेथे ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी आराखडा आखून ती वस्ती आगाशिवनगरच्या डोंगराकडेच्या जागेत नेऊन पुनर्वसित केली. त्यानंतरही आजअखेर पालिकेतील कोणत्याच नेत्याला झोपडपट्टीच नव्हे तर एकाही झोपडीचे यशस्वी पुनर्वसन करता आलेले नाही.

loading image
go to top