Woman Doctor:'फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निवृत्त न्यायाधीशांच्या समितीची स्थापना'; राज्य शासनाचा निर्णय !
Phaltan Doctor endlife: फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, या प्रकरणाची सखोल तपासणी व्हावी, अशी मागणी वाढत चालली आहे. त्यानंतर अखेर राज्य शासनाने तात्काळ कारवाई करत निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती गठित केली आहे.
सातारा : फलटण येथील वैद्यकीय रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी निवृत्त न्यायाधीश संजय मेहरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शासनाने आज चौकशी समिती नेमली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.