कऱ्हाडात राज्यमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू; नागरिकांतून समाधान

कऱ्हाडात राज्यमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू; नागरिकांतून समाधान

मलकापूर (जि. सातारा) : कऱ्हाड-मार्केट यार्ड-नांदलापूर-कोकरूड या राज्यमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक विघ्नांनी ग्रासलेल्या शहरातील येथील रस्त्याचा टप्पा लवकरच पूर्ण होत आहे. 2013 पासून रखडलेला रस्ता अखेर लवकरच पूर्ण होणार असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
 
या मार्गासाठी 2011 ला तत्कालीन नगरपंचायतीने आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना विशेष निधीतून 12 कोटींची मागणी केली. निधी मंजूर झाला. आमदार चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सॅम्पल रस्ताही झाला. मात्र, सांडपाणी योजना, अतिक्रमणामुळे व नुकसानभरपाईच्या वादात काम थांबले. कामासाठी तयार केलेले अंदाजपत्रक दर वाढून 12 वरून 17 कोटींवर गेले. सत्ताधाऱ्यांनी त्याचा पाठपुरावा करून तोही निधी मिळवला. त्यानंतर वर्क ऑर्डरही मिळूनही कामाला चालना मिळत नसल्याने येथील भाजप नगरसेवकांसह नागरिकांनी बांधकाम विभागाला निवेदन देऊन कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशाराही दिला. 

त्यानंतर विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे माजी अध्यक्ष अतुल भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. या रस्त्यामुळे दळणवळणासाठी चालना मिळणार असून कोल्हापूर नाका, ढेबेवाडी व मलकापूर फाट्यावरती होणारी गर्दी कमी होणार आहे. अनेक वर्षांपासून अनेक कारणांमुळे रखडलेला रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून लवकरच रस्ता पूर्ण होत आहे. 

रस्ता व्हावा ही स्थानिक लोकांची प्रबळ इच्छा असल्याने नागरिकांनी रस्त्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढून त्यासाठी जागा देवून सहकार्य केल्याने रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. लवकरच पुढच्या टप्प्याचे काम हाती घेणार आहे. 

- प्रमोद मोटे, शाखा अभियंता, विशेष प्रकल्प, कऱ्हाड 

या आरसीसी रस्त्याचे काम अतिशय चांगल्या दर्जाचे झाले आहे. काम कासगवतीने झाले पण चांगले झाले, याचे समाधान आहे. रस्त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना, शालेय मुलामुलींना, वाहनधारकांना होणारा त्रास टळणार आहे. 

- व्यकंटराव यादव, रहिवासी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com