कऱ्हाड - महाराष्ट्रात काही महिन्यापासून प्रचंड पाऊस पडत आहे. राज्याच्या बुलढाणा, यवतमाळ, नंदुरबार, जालना या दौऱ्यात बिकट परिस्थिती पहायला मिळाली. नाशिकला मोर्चाद्वारे संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली जाणार आहे..सरकारने सर्व निकष, नियम बाजूला ठेवून तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी येथे केली. यावेळी भविष्यात प्रत्येक जिल्ह्यानुसार आंदोलन करून आवाज उठवणार असल्याचे त्यांनी संगितले..मुंबई येथे मराठा आंदोलनादरम्यान आंदोलकांना मदत केल्याबद्दल कऱ्हाड (जि. सातारा) येथील मराठा समाज बांधवांकडून येथील शासकीय विश्रामगृहात आमदार शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कर्जमाफी संदर्भात ते म्हणाले, सरकार काय कर्जमाफी करणार? या सरकारवरच साडेदहा हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे..मे महिन्यापासून खरीप व रब्बी पिके वाया गेली. शेतकरी प्रचंड अडचणीत आले आहेत. १३०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारने संपूर्ण कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा निर्धारही त्यांनी यावेळी व्यक्त केला.आमदार गोपीचंद पडकळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टिकेवर ते म्हणाले, महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृत राजकारणाचा महाराष्ट्र म्हणून आहे. मात्र, महाराष्ट्रात हल्ली काही लोक चुकीचे वक्तव्ये करत आहेत. सरकारमध्ये असणारे लोक सरकारच्या यंत्रणेचा आधार घेऊन जर, काही करत असतील, थोर व्यक्तिमत्त्वाचा अवमान करण्याचे सातत्याने धाडस करत असतील, तर ते खपवून घेणार नाही..स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली रणनीती काय? यावर ते म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून बाळासाहेब थोरात व अन्य नेत्यांशी चर्चा केली आहे. आताच जागा वाटपाबाबत चर्चा करू या, नंतर चर्चा करायला लागतो, तोपर्यंत उशीर होतो.प्रत्येक जिल्ह्याच्या नेत्यांना प्रत्येक जिल्हाध्यक्ष, विभागप्रमुख यांच्याशी चर्चा करून जागा वाटपाबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्या आहेत. सध्या लोकांत असंतोषाचे वातावरण आहे. फक्त त्याला क्रांतीचे स्वरूप दिले तर, निकाल वेगळे लागतील..परंतु, सरकारमध्ये असलेले लोक त्यांच्या प्रश्नांपेक्षा, जनतेच्या निकालापेक्षा मत चोरीला फार महत्त्व देत आहेत. पण, ९० टक्के जनतेने जर क्रांती केली, तर निश्चितपणाने या देशात व राज्यात बदल पाहायला मिळेल, असेही त्यांनी सांगितले..मुख्यमंत्र्यांनी भुमिका स्पष्ट करावीभाजपने काही लोकांना स्क्रिप्ट दिली आहे. काही लोकांना मराठा, तर काहींना ओबीसींविरोधात वक्तव्य करायला लावून, दोन समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असा टोला मंत्री छगन भुजबळ यांना लगावून आमदार शिंदे म्हणाले, छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आहेत. निर्णय कॅबिनेट मंत्रिमंडळात झाला आहे. दोन समित्या झाल्या आहेत. त्यातील ओबीसी समितीत ते स्वत आहेत..तरीही समाजात जावून समाजविरोधी वक्तव्य करणे चुकीचे आहे. सरकार म्हणून नेमकी भूमिका काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. अशा चर्चा करून राजकारण करत आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न असल्याची शंका असून, राज्यातील समाजाची असलेली एकसंघता विभाजित करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही श्री. शिंदे यांनी यावेळी केला..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.