esakal | बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या

राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे एसटी प्रशासनाने वाहतूक सुरू केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विविध मार्गांवरील वाहतूक आज (गुरुवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे.

बाप्पांच्या जयघाेषात साताऱ्यात एसटी सुरु ; अशा आहेत गावांच्या फेऱ्या

sakal_logo
By
संजय साळुंखे

सातारा ः गेल्या पाच महिन्यांपासून बंद असलेली असलेली सातारा जिल्ह्याबाहेरील एसटीची वाहतूक आज (ता. 20) सकाळी सात वाजल्यापासून पुन्हा सुरू झाली आहे. एका बसमधून आता कमाल 22 प्रवाशांची वाहतूक करण्यात येत आहे.
 
कोरोनाच्या लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाची वाहतूक 18 मार्चपासून टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आली होती. जिल्हाबंदी असल्यामुळे एसटीची आंतरजिल्हा वाहतूक बंद होती. जिल्ह्यांतर्गत एसटी वाहतूकही टप्प्याटप्प्याने सुरू झाली. मात्र, पुरेसे प्रवाशी मिळत नसल्याने बहुतांश बसच्या फेऱ्याही रद्द होत होत्या. या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी बसच्या वाहतुकीला परवानगी दिली. त्यानुसार शासनाच्या निकषांचे पालन करून ही सेवा सुरू केली आहे.

अवतार दिन विशेष : श्री चक्रधर स्वामी कलीयुगातील सर्वस्पर्शी अवतार 

राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे एसटी प्रशासनाने वाहतूक सुरू केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. विविध मार्गांवरील वाहतूक आज (गुरुवार) सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली आहे. बस स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन आवश्‍यकतेनुसार बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक फेरीनंतर बस स्वच्छ केली जाईल. त्यानंतर निर्जंतुकीकरण केले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

गुलाबी रंगाच्या पर्सची का हाेतेय चर्चा.. वाचा सविस्तर

गावी जाणाऱ्या गणेशभक्तांनाे... तुमच्यासाठी टाेलमाफ, अट वाचा 

या मार्गांवर बस धावणार... 

सातारा-मुंबई सेंट्रल, सातारा-ठाणे-बोरिवली, सातारा-सायन-बोरिवली, सातारा-स्वारगेट, मेढा-सातारा-सोलापूर, मेढा-सातारा-नृसिंहवाडी, मेढा-कोल्हापूर, वाई-मुंबई, वाई-सातारा-सोलापूर, वाई-स्वारगेट, कऱ्हाड-सोलापूर, कऱ्हाड-विटा, महाबळेश्‍वर-महाड-मुंबई, महाबळेश्‍वर-मुंबई, महाबळेश्‍वर-पंढरपूर, महाबळेश्‍वर-पुणे स्टेशन, पाटण-कऱ्हाड-सोलापूर, पाटण-कऱ्हाड-सांगली, फलटण-स्वारगेट, फलटण-पुणे स्टेशन, फलटण-सांगली, फलटण-अक्कलकोट, म्हसवड-इचलकरंजी, दहिवडी-कोल्हापूर, वडूज-सांगली. दरम्यान अधिक माहितीसाठी प्रवाशांनी सातारा बसस्थानक (02162 - 234567) अथवा नजीकच्या बस स्थानकावर चाैकशी करावी.  

सातारा जिल्ह्यात 'या' गावातील दारूबंदीचे काय झाले? महिला आक्रमक

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top