साताऱ्यात स्वच्छता मोहीम तातडीने राबवा; भाजपची नगराध्यक्षांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

कोविडमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शहरात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रभाग सातमध्ये प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच शहरात भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

सातारा : शहरासह प्रभाग क्रमांक सातमध्ये स्वच्छता मोहीम तातडीने राबवावी, असे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने नुकतेच नगराध्यक्षा माधवी कदम यांना देण्यात आले.

कोविडमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. शहरात आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. प्रभाग सातमध्ये प्राधान्याने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. तसेच शहरात भटक्‍या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून, नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे.

माणच्या तहसीलदारपदावर मानेंचेच वर्चस्व, सांगलीच्या सानपांची निराशा 

भटक्‍या कुत्र्यांसंदर्भात तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना गटनेते सिद्धी पवार, विकास गोसावी, अमोल कांबळे, शहराध्यक्ष सुनील कोळेकर आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement To BJP Mayor Madhavi Kadam For Carrying Out Cleaning Campaign In Satara