लावणी सम्राज्ञीच्या नातवाचा खून? पोलिसांनी निःपक्षपाती चौकशी करावी

Kolhati samaj
Kolhati samajesakal
Updated on
Summary

आमचा पोलिस खात्यावर व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिस यंत्रणेने या घातपाताची निःपक्षपाती चौकशी करावी.

वाई : सोनगीरवाडीतील अभय शशिकांत जावलीकर Abhay Jawalikar (वय १७) याने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाला असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. त्याबाबतचे निवेदनही पोलिसांना दिले आहे. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याची विशेष पथकामार्फत सखोल चौकशी करून जावलीकर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र कोल्हाटी व डोंबारी समाज संघटनेने पोलिसांना (Wai Police) दिले.

वाईचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व उपनरीक्षक कृष्णा पवार यांना निवेदन देण्यात आले. शशिकांत जावलीकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अभय हा मंगळवारी (ता. ५) बेपत्ता झाला होता. दुसऱ्या दिवशी एकसर गावाच्या हद्दीत निर्जन स्थळी त्याचा मृतदेह सापडला. त्यासंबंधी पोलिस विभागामार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, ज्या स्थितीत तो सापडला त्यावरून त्याचा घातपात झाला असलेबाबत त्यांचे कुटुंबीयांकडून अज्ञातांवर गुन्हा दाखल करावा व त्याची सखोल चौकशी करण्यासाठी स्पेशल ब्रँच त्वरित नेमावे, अशी मागणी केली आहे. अभय हा लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचा नातू असून, त्या संघटनेच्या माजी अध्यक्ष होत्या. त्याच्या कुटुंबावर ओढवलेले हे संकट संपूर्ण कोल्हाटी समाजावर कोसळले आहे.

Kolhati samaj
'त्यांना घेऊन निवडणूक लढवणार असाल, तर तो शरद पवारांचा अपमान असेल'

आमचा पोलिस खात्यावर व न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पोलिस यंत्रणेने या घातपाताची निःपक्षपाती चौकशी करावी. चौकशी १५ दिवसांत केली नाही, तर संघटनेच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात दिला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक व तहसीलदार यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. या वेळी संघटनेचे अध्यक्ष वसंतराव मोहोरकर, कार्याध्यक्ष धोंडिराम जावळे, सरचिटणीस मनोहर ताथवडकर, दत्ता गाडे- नीलकंठ, चंद्रकांत जावळेकर, राहुल गाडे, नारायण जावळीकर, शामराव गाडे, जयवंत जावळीकर, शांताराम लाखे, अशोक लाखे, नौशाद जावळे, शिवाजी लाखे, भीमराव काळोखे, शांताराम लाखे आदी उपस्थित होते.

Kolhati samaj
पत्रिकेवर नाव नसलं, तरी देवेंद्रंचं नाव जनतेच्या मनात कायम : दरेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com