esakal | खंडाळ्यातील वीर धरणग्रस्तांच्या अडचणी सोडविणार; रामराजेंची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

Ramraje Naik-Nimbalkar

खंडाळा तालुक्यातील वीर धरणग्रस्त पुनर्वसनसंदर्भात मंत्र्यांसमवेत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे रामराजेंनी सांगितले.

खंडाळ्यातील वीर धरणग्रस्तांच्या अडचणी सोडविणार; रामराजेंची ग्वाही

sakal_logo
By
अशपाक पटेल

शिरवळ (सातारा) : खंडाळा तालुक्यातील (Khandala Taluka) वीर धरणग्रस्त पुनर्वसनसंदर्भात 15 सप्टेंबरनंतर संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात येईल. यातून वीर धरणग्रस्तांच्या अडचणी लवकरच सोडविणार असल्याचे प्रतिपादन विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Speaker Ramraje Naik-Nimbalkar) यांनी केले. ते शिरवळ येथे संघर्ष समितीचे (Shirwal Sangharsh Committee) पदाधिकारी व धरणग्रस्त शेतकऱ्यांनी निवेदनावर चर्चा करताना बोलत होते.

या चर्चेदरम्यान इतर प्रकल्पांचे पुनर्वसन खंडाळा तालुक्यात होत असताना तालुक्यातील प्रकल्पांच्या धरणग्रस्तांचे पुनर्वसन मात्र मंगळवेढा, पंढरपूर अशा दूरच्या, भौगोलिक दृष्ट्या अडचणीच्या व असुरक्षित तालुक्यात करण्यात येत आहे. तसेच गेली ६० वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही पुनर्वसन प्रलंबित असल्याचे व अशा अनेक अडचणी येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्दशनास आणून दिल्या. यानंतर या संदर्भाने 15 सप्टेंबरनंतर संबंधित खात्याचे मंत्री व अधिकाऱ्यांसमवेत मंत्रालयात मिटिंगचे आयोजन करण्यात येईल, असेही रामराजेंनी स्पष्ट केले.

हेही वाचा: NCP च्या आमदार शिंदेंना चुकांच्या परिमार्जनाची संधी

Shirwal Sangharsh Committee

Shirwal Sangharsh Committee

यावेळी राष्ट्रवादी औद्योगिक सेल सातारा जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ, संघर्ष समितीचे समन्वयक डॉ. विजय शिंदे, अध्यक्ष देवानंद चव्हाण, सचिव अजिंक्य चव्हाण, उपसरपंच महेश चव्हाण, अॅड. नारायण चव्हाण, अंतोबा पाटील, अनंतराव चव्हाण, हरिचंद्र लिमण, अनिकेत चौधरी व धरणग्रस्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या भेटीसाठी राष्ट्रवादी औद्योगिक सेल जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ यांनी विशेष सहकार्य केले.

loading image
go to top