वाघ्या-मुरळी संघटनेचे पालकमंत्र्यांना साकडे; कलावंतांना न्याय देण्याची मागणी

हेमंत पवार
Monday, 12 October 2020

मागील वर्षी अतिवृष्टी, त्यानंतरची निवडणूक आचारसंहिता यामुळे कलावंतांना जगण्यापुरतेही उत्पन्न मिळू शकले नाही. त्यानंतर कोरोनाची कुऱ्हाड कोसळल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, मुला-मुलींचा शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या-मुरळीची शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी आदी मागण्या प्रमोद शिंदे यांनी केल्या आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, वाघ्या-मुरळीची शासनदरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी, लोककलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, लोककलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, असे साकडे वाघ्या-मुरळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद शिंदे व सहकाऱ्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना घातले. 

वाघ्या-मुरळी परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मार्तंड साठे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी पालकमंत्री पाटील यांना मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अविनाश पवार, पाल शाखाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, कऱ्हाड तालुका सचिव सोमनाथ शिंदे, उपाध्यक्ष समाधान कदम, महाराष्ट्र सल्लागार पुरुषोत्तम घोरपडे, शिवाजी पवार, प्रमोद कुलकर्णी, महेश घोरपडे, छबुताई कोरेगावकर, अनिल गायकवाड, लता गायकवाड, सदस्य प्रदीप पवार उपस्थित होते. 

महाराष्ट्रातील समृद्धी शेडगेची 'इस्त्रो'त चमक 

निवेदनातील माहिती अशी, मागील वर्षी अतिवृष्टी, त्यानंतरची निवडणूक आचारसंहिता यामुळे या कलावंतांना जगण्यापुरतेही उत्पन्न मिळू शकले नाही. त्यानंतर कोरोनाची कुऱ्हाड कोसळल्यामुळे त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी वाघ्या-मुरळी कलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी अनुदान स्वरूपात मंजूर करावा, मुला-मुलींचा शिक्षणाचा खर्च शासनामार्फत करण्यात यावा, वाघ्या-मुरळीची शासन दरबारी अधिकृत मान्यता मिळवून नोंदणी करावी, कलावंतांच्या निवासासाठी शासनाकडून जमीन, घर या स्वरुपात विशेष योजना मंजूर करावी, कायमस्वरुपी पेन्शन योजना सुरू करावी, लोककलावंत आर्थिक विकास मंडळ स्थापन करावे, लोक कलावंतांना कुलाचाराचे कार्यक्रम करण्यास परवानगी मिळावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Statement Of Waghya-Murali Association To The Guardian Minister Balasaheb Patil Satara News