
म्हसवड: हिंगणी (ता. माण) येथील राहत्या घराजवळून अज्ञात चोरट्याने आठ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. त्यानंतर अवघ्या पाच तासांच्या अवधीतच ट्रॅक्टरसह संबंधित संशयितास शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. याप्रकरणी धनाजी पुनाजी लोखंडे (रा. दिवड, ता. माण) या संशयितास ताब्यात घेतले आहे.