
सातारा : शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या बाँबे रेस्टॉरंट ते संगममाहुली या मुख्य मार्गावर ५७ स्ट्रीट लाइट नव्याने उभ्या करूनही बंद आहेत. या खांबावरील दिव्यांचे वीजबिल कोणी भरायचे? यावरून मुख्य मार्गावरील वीज दिवे बंद असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाच्या या कचखाऊ कारभारामुळे प्राथमिक सुविधा असलेली वीज देखील मिळत नसल्याचे वास्तव पुढे आले आहे.