
वहागाव : गणेशोत्सव, ईद, दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तळबीड पोलिस पूर्णपणे सज्ज झाले आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांनी दिलेल्या सूचनेनुसार तळबीड पोलिस ठाण्याचे पोलिस सहाय्यक निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली पथकाने हद्दीतील गावांत संचलन केले. या माध्यमातून शांतता आणि सुरक्षेचा संदेश दिला.