साताऱ्यातील चौकाचौकांत नाकाबंदी; विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत.
Lockdown
Lockdownesakal
Updated on

सातारा : लॉकडाउन असतानाही कोणत्याही सबळ कारणाशिवाय शहरात फिरणाऱ्यांची धरपकड करण्यासाठी सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा शहर वाहतुक शाखेने शहरातील विविध चौकांची नाकाबंदी करत कारवाईचे सत्र आरंभले होते. दिवसभरात अनेक दुचाकी, चारचाकी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून येत्या काही दिवसांत वाहने जप्तीची मोहिम हाती घेण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पुकारलेल्या लॉकडाउनमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आलेल्या आहेत. या अत्यावश्‍यक सेवांच्या नावाखाली अनेक सातारकर राजरोस शहराच्या विविध भागात दुचाक्‍या, चारचाक्‍या घेवून फिरत आहेत. या साताकरांना अडवत पोलिस कर्मचारी चौकशी करत असतात. चौकशीत अगदी शुल्लक कारणासाठी संबंधित वाहनचालक घराबाहेर पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते.

आज सकाळी पोलिसांनी मोती चौक, देवी चौक, कमानी हौद, शाहु चौक, पोवईनाका, शेटे चौक, जुना मोटार स्टॅंड चौकातील रस्ते बॅरिकेट लावून बंद करत येणाऱ्याजाणाऱ्याची चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्यांवर कारवाईचे सत्र यानंतर पोलिसांनी आरंभले. दिवसभर हे सत्र सुरुच होते. मुख्य रस्त्यावर कारवाई होत असल्याने सातारकरांनी गल्लीबोळातील रस्त्यांचा आधार घेतला. यामुळे अनेक ठिकाणच्या अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झाली होती. येत्या काही दिवसांत वाहने जप्तीची मोहिम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दिली.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Cannot Speak or Walk, Yet Shivprasad Achieves 66% in SSC and Inspires Many
Virmade Fata on Pune-Bengaluru Highway Becomes Accident-Prone Zone
Government to Verify All E-Peek Entries Under Revised Transparency Rules
Simplicity and Memories: Mahadev Jankar Shares Emotional Moments with Shepherds
Marathi News Esakal
www.esakal.com