साताऱ्यात आठवडाभर कडक Lockdown; सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू

Strict Lockdown
Strict Lockdownesakal

सातारा : कोरोना संसर्गाचा (Coronavirus) वेग वाढल्याने साखळी तोडण्यासाठी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी सोमवारी (ता. 24) मध्यरात्रीपासून एक जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये मेडिकलची दुकाने वगळता उर्वरित सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत सकाळी सात ते नऊ यावेळेत दूध विक्रीस परवानगी दिली असून अत्यावश्‍यक सेवेतील वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना पेट्रोल व डिझेल विक्रीस बंदी असेल, तर काही अटी शर्तींवर घरपोच सुविधा सुरू राहणार आहे. (Strict Lockdown In Satara District From Monday To June One Satara Marathi News)

Summary

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे साखळी तोडण्यासाठी गेली तीन आठवडे जिल्ह्यात लॉकडाउन सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे साखळी तोडण्यासाठी गेली तीन आठवडे जिल्ह्यात लॉकडाउन सुरू आहे. या लॉकडाउनमधून अत्यावश्‍यक वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाने पुकारलेला लॉकडाउन संपणसाठी एक आठवडा बाकी असतानाच जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज शनिवारी लॉकडाउनची नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार 24 मेच्या मध्यरात्री बारापासून याची अंमलबजावणी होणार आहे. या लॉकडाउनमधून रूग्णालये निदान केंद्रे, पशुवैद्यकिय दुकाने यांना वगळण्यात आले असून दूध वितरणासाठी सकाळी सात ते नऊ यावेळेत परवानगी देण्यात आली आहे.

Strict Lockdown
Good News : ग्रामपंचायतींना 26 कोटींची लॉटरी

शेतीविषयक दुकाने बंद राहणार असून त्यांना घरपोच सुविधेसाठी सकाळी सात ते सायंकाळी पाचची वेळ देण्यात आली आहे. यासाठी संबंधित दुकानदाराने ग्राहकांची मागणी फोनव्दारे नोंदवून घेणे आवश्‍यक आहे. शिवभोजन थाळी, शितगृहे, गोदाम सेवा मान्सूनपूर्व उपक्रम, स्थानिक प्राधिकरणाच्या सेवा, बॅंकिंग कार्यालये, टेलिफोन देखभाल दुरूस्ती आदींना यातून सुट देण्यात आली आहे. अत्यावश्‍यक सेवेतील वाहने वगळता इतर सर्व वाहनांना पेट्रोल डिझेल विक्री करता येणार नाही.

हे सुरू राहणार....

  • अत्यावश्‍यक सेवेतील दुकाने, हॉस्पिटल...

  • वृत्तपत्राचे वितरण आणि विक्री

  • नियमाधिन राहून रिक्षा व टॅक्‍सी वाहतूक

  • दूध घरपोच वितरणास दोन तासांचा अवधी

  • खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसेस

  • सर्व प्रकारची माल वाहतूक

  • शासकिय व खासगी सुरक्षा सेवा

Strict Lockdown
नागरिकांनो! बाहेर फिरणं बंद करा, अन्यथा घरात येऊन घेतली जाणार 'कोरोना टेस्ट'

पूर्णपणे बंद

  • अत्यावश्‍यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने.

  • मटण, चिकन, अंडी विक्रीची दुकाने

  • बार, हॉटेल्स, दारूची दुकाने

  • एसटीची प्रवाशी वाहतूक

  • सर्व खासगी व सहकारी बॅंका

  • भाजीपाला, बेकरी, फळविक्री

  • नॉन बॅंकिंग वित्तीय महामंडळे

  • सर्व प्रकारची बांधकाम क्रिया

Strict Lockdown In Satara District From Monday To June One Satara Marathi News

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com