Strict Lockdown : साताऱ्यात आठ जूनपर्यंत कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lockdown

कोरोना रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्याचा लॉकडाउन शासनाने 15 जूनपर्यंत वाढविला आहे.

Strict Lockdown : साताऱ्यात आठ जूनपर्यंत कडक निर्बंध; काय सुरु, काय बंद? वाचा सविस्तर

सातारा : कोरोना (Coronavirus) रुग्णांची साखळी तुटण्यासाठी सध्याचा लॉकडाउन (Lockdown) शासनाने 15 जूनपर्यंत वाढविला आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णांची संख्या पाहता साखळी तुटण्यासाठी सध्या लागू असलेले कडक लॉकडाउन जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी एक ते आठ जूनपर्यंत कायम ठेवले आहे. मात्र, काही बाबींना यामध्ये सूट दिली असून, रास्त भाव (रेशन) दुकाने सकाळी सात ते अकरा, औषध दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात, कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळे, भाजीपाला घाऊक खरेदी- विक्री सकाळी सहा ते अकरा या वेळेत करण्यास परवानगी दिली आहे. (Strict Lockdown In Satara District Till June 8 Satara Marathi News)

घरपोच फळे व भाजीपाला सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यास परवानगी आहे. शेतीविषयक बियाणे, खते, उपकरणे त्यांची दुरुस्ती व देखभाल सेवांची दुकाने सकाळी नऊ ते दुपारी तीन वेळेत सुरू राहतील. सकाळी नऊ ते सायंकाळी सात यावेळेत घरपोच सेवा देतील. ग्राहकांनी विक्रेत्यांकडे ऑनलाइन किंवा संपर्काद्वारे मागणी करून घ्यावी लागतील. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार 17 मेपासून कडक लॉकडाउन लागू केले आहेत. जिल्ह्यातील बाधितांची आकडेवारी कमी होत नसल्याने उद्या (एक जून) पासून संपणारे कडक लॉकडाउन (Strict Lockdown) आणखी आठ दिवस म्हणजे आठ जूनपर्यंत कायम ठेवले आहे; पण काही बाबींना यामध्ये थोडी सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा: फलटण-म्हासुर्णे रस्त्याची 'Limca Book'मध्ये नोंद; बांधकाम मंत्र्यांकडून विशेष कौतुक

त्यानुसार रेशन दुकाने सकाळी सात ते अकरा यावेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. या दुकानातून सध्या मोफत धान्य वितरण सुरू आहे, तसेच औषधे दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी सात, तर हॉस्पिटलमधील औषध दुकाने (Medical Stores) 24 तास सुरू राहणार आहेत. कृषीशी संबंधित बियाणे, खते, उपकरणे दुरुस्ती व विक्रीची दुकाने सकाळी सहा ते 11 या वेळेत सुरू राहतील. त्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बियाणे खरेदी करणे सोपे झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत फळे, भाजीपाला घाऊक पद्धतीने खरेदी विक्रीसाठी सूट देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी सहा ते अकरा यावेळेत हे व्यवहार सुरू राहतील. किरकोळ ग्राहक व किरकोळ विक्रेत्यांना खरेदी करण्यास मनाई असेल. घाऊक व्यापाऱ्यांनी किरकोळ व्यापाऱ्यांना विक्री करावी लागणार आहे. मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. फळे व भाजीपाला सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत घरपोच देण्यास परवानगी आहे. त्याचे नियोजन उपविभागीय अधिकारी यांनी करायचे आहे. उर्वरित सर्व काही बंद राहणार आहे.

हेही वाचा: कोरोनायोद्‌ध्यांना सलाम! पाचवडेश्वरात 41 गावांतील 232 बाधितांवर अंत्यसंस्कार

वर्तमानपत्रे घरपोच मिळणार...

लॉकडाउन कडक राहणार असले, तरी वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके छपाईस व वितरणास परवानगी राहणार आहे. मात्र, त्याचे वितरण केवळ घरपोच करता येणार आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे.

हे बंद राहणार

 • व्यापारी दुकाने, किराणा, किरकोळ विक्रीची सर्व दुकाने

 • उपहारगृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉट, मॉल बाजार, मार्केट

 • भाजी मार्केट, फळ मार्केट, आठवडी, दैनंदिन बाजार, मंडई फेरीवाले

 • वाईन शॉप, बिअर शॉपी, देशी दारूची दुकाने

 • मटण, चिकन, अंडी, मासे विक्री

 • रस्त्याच्या कडेला असणारी खाद्य दुकाने

 • बेकरी पदार्थ विक्री

 • माल वाहतूक, दुरुस्ती गॅरेज, स्पेअरपार्टस्‌ विक्री दुकाने

 • माल वाहतूक व अत्यावश्‍यक सेवा वाहनांच्या दुरुस्तीची गॅरेज

 • एसटीची प्रवासी वाहतूक सेवा

 • बांधकामाशी संबंधित सर्व क्रिया

 • सिनमागृहे, नाट्यगृहे, करमणूक नगरी

हेही वाचा: रुग्णालय खासगी संस्थेला दिल्यास माझ्याशी गाठ; खासदार रणजितसिंहांचा रामराजेंना इशारा

हे सुरू राहणार

 • सहकारी बॅंका एटीएममध्ये पैसे भरणे, चेक क्‍लिअरन्स, डाटा सेंटर कामे सकाळी अकरा ते दोन

 • रिक्षा, टॅक्‍सी अत्यावश्‍यक सेवेसाठी

 • खासगी वाहतूक अत्यावश्‍यक सेवेसाठी

 • खासगी बसने आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक (50 टक्के प्रवासी)

 • पेट्रोल पंप अत्यावश्‍यक वाहनांसाठी 24 तास सुरू

 • व्हेटरिनरी हॉस्पिटल, ऍनिमल केअर शेल्टर्स व पेट शॉप्स

 • दूध संकलन केंद्रे सकाळी सात ते नऊ व सायंकाळी सहा ते आठ घरपोच सुविधा

 • कृषीविषयक दुकाने सकाळी नऊ ते तीन, तर घरपोच सुविधा सकाळी नऊ ते सात

 • शिवभोजन थाळी केवळ पार्सल सुविधा

 • शीतगृहे व गोदाम सेवा

 • मॉन्सूनपूर्व सेवा व उपक्रम

 • स्थानिक प्राधिकरणांच्या सर्व सार्वजनिक सेवा

 • भारतीय सुरक्षा मंडळ कार्यालये

Strict Lockdown In Satara District Till June 8 Satara Marathi News

loading image
go to top