

Crores Lost as Heavy Winds Rip Off Shed Sheets, Sugar Stock Damaged by Rain
sakal
रहिमतपूर: जयपूर (ता. कोरेगाव) येथील शिवनेरी शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याला मागील आठवड्यात झालेल्या वादळी पावसाचा मोठा फटका बसला. वादळी वाऱ्यामुळे साखर साठवणूक गोदामाचे छत उडाल्याने सुमारे ७४ हजार क्विंटल साखर भिजून खराब झाली असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.