

Heavy Rain and Strong Winds Wreak Havoc on Kari Zilla Parishad School
esakal
परळी : परळी खोऱ्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसासह सुटलेल्या वादळी वाऱ्याने कारी गावातील जिल्हा परिषद शाळेचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे शाळेच्या इमारतीवरील पत्रे उडून गेल्याने पावसाचे पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये शिरले. परिणामी शाळेतील महत्त्वाची कागदपत्रे, शैक्षणिक साहित्य, फर्निचर आणि अन्य शालेय साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.