
सातारा : माजी सैनिक, सैनिकांच्या पत्नी, वीर माता, वीर पिता, वीर पत्नी यांची महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यासाठी सैनिक कल्याण केंद्रात सोय करण्यात आली आहे. जिल्ह्यात माजी सैनिकांची संख्या मोठी असून, सर्वांची नोंदणी सुरू असल्यामुळे या प्रक्रियेला वेळ जात आहे, तसेच ज्यांच्या जन्मतारीखेत बदल आहे, आधारकार्ड अपडेट नाही, जुने दाखले ग्रामपंचायतींकडून मिळू शकत नाहीत, अशा माजी सैनिक व त्यांच्या पत्नींना ही कागदपत्रे मिळवताना अडचणी येत आहेत. दरम्यान, सैनिक कल्याण कार्यालयाने अडचण येणाऱ्या माजी सैनिकांचे गाऱ्हाणे लेखी स्वरूपात घेऊन त्यावर उपाय योजनेसाठी प्रयत्न करावा, अपेक्षा ज्येष्ठ माजी सैनिकांकडून होत आहे.