
सातारा : सध्याच्या काळात रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहात असल्याचे समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. ही मोहीम १५ जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे. सर्वेक्षणानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळेत प्रवेश देण्यात येऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणार आहे.