
सोमंथळी : फलटण- बारामती महामार्गावर वर्षभरातच भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटला भेगा पडल्याने ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होताना दिसून येत आहे. या रस्त्यावर होणाऱ्या दुचाकी वाहनांच्या अपघातांमुळे संबंधित ठेकेदाराने उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांतून होऊ लागली आहे.