स्वच्छ सर्वेक्षणात मलकापूरचा डंका; देशात 25 वा क्रमांक

राजेंद्र ननावरे
Friday, 28 August 2020

पालिकेने समाजातील सर्व घटक व नागरिक यांच्या लोकसहभागातून 2020 मध्ये पहिल्या दहामध्ये येण्यासाठीचे ध्येय ठेवले होते. त्याप्रमाणे काम करून देशस्तरावर एक लाखाच्या आत लोकसंख्या असणाऱ्या 4383 स्थानिक स्वराज्य संस्थांत 25 वा व पश्‍चिम भारतातील 1003 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 11 वा आणि महाराष्ट्रातील 396 स्थानिक स्वराज्य संस्थांत दहावा क्रमांक मिळवला.

मलकापूर (जि. सातारा) : स्वच्छ भारत मिशन, स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाने घेतलेल्या 2020 च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये मलकापूर पालिकेने 2018-19 च्या तुलनेने भरारी घेतली असून, देशात 25 वा व पश्‍चिम भारतात 11 वा क्रमांक प्राप्त केल्याची माहिती मनोहर शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. शिंदे म्हणाले, मलकापूरने स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सहभाग घेतला असताना नगरपंचायतीचा पश्‍चिम भारतामध्ये 146 वा, तर 2019 मध्ये देशात 66 वा व पश्‍चिम भारतामध्ये 51 वा क्रमांक आला होता. पालिकेने समाजातील सर्व घटक व नागरिक यांच्या लोकसहभागातून 2020 मध्ये पहिल्या दहामध्ये येण्यासाठीचे ध्येय ठेवले होते. त्याप्रमाणे काम करून देशस्तरावर एक लाखाच्या आत लोकसंख्या असणाऱ्या 4383 स्थानिक स्वराज्य संस्थांत 25 वा व पश्‍चिम भारतातील 1003 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 11 वा आणि महाराष्ट्रातील 396 स्थानिक स्वराज्य संस्थांत दहावा क्रमांक मिळवला. 

सातारा जिल्ह्यात 12 कोरोनाबाधितांचा मृत्यू; 505 नवे रुग्ण 

शहरातील विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळे, स्वच्छतादूत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक-शिक्षिका, सर्व जिल्हा परिषद व खासगी शाळांचे विद्यार्थी, नगराध्यक्षा नीलम येडगे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, आनंदी शिंदे, कमल कुराडे, मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नगरसेवक व नगरसेविका तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर योगदान लाभले आहे.

अतिपावसाने शेतातच मूग, घेवड्याला आले कोंब 

स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये पालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेचे काम पूर्ण करून शहर पहिल्या पाचमध्ये आणण्याचा मनोदय सर्वांनी व्यक्त केला.  या सन्मानाबद्दल माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार श्रीनिवास पाटील यांनी पालिकेचे कौतुक केले. नगराध्यक्षा नीलम येडगे यांनी आभार मानले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success Of Clean Survey Malkapur