

Global Literary Footprint: Sudesh Hinglaspurkar Attends 47 Sammelans Across Continents
sakal
-स्वप्नील शिंदे
छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी (सातारा) : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हटले, की साहित्यिकांची भाषणे, चर्चासत्रे आणि ग्रंथदिंडी डोळ्यासमोर येते; पण या सोहळ्याचा असा एक पडद्यामागचा नायक आहे, ज्याच्यासाठी हे संमेलन केवळ वार्षिक उत्सव नसून ती गेली ४७ वर्षे अखंड सुरू असलेली एक ‘साहित्यवारी’ आहे. ग्रंथाली प्रकाशन संस्थेचे कार्यकारी विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी साताऱ्याच्या ९९ व्या साहित्य संमेलनात सहभागी होऊन आपल्या ४७ संमेलनांचा टप्पा पूर्ण केला आहे.