

Pune Water Security Plan Government Forms Study Group to Assess Water Demand and Resources Until 2051 in Pune Metropolitan Region
sakal
कऱ्हाड : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला, की जिल्हाभरातून अपघातांत वाढ होते. मागील काही दिवसांत त्या अपघातात वाढ झाली आहे. मलकापूरचा अपघात त्यात अत्यंत गंभीर आहे. ओव्हरलोड उसाची ट्रॉलीच उलटल्याने एक महिलेचा जीव गेला. तरीही त्याकडे अपेक्षीत गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे नियमांची पायमल्ली अन् यंत्रणाही ढिम्म अशी स्थिती दरवर्षी पाहायला मिळत आहे. अपघातांची कारणे वर्षानुवर्षे तीच आहेत, तरीही अपघात टाळण्यासाठी सर्वंकष प्रयत्न होत नाहीत. रिफ्लेक्टर, वाहतुकीच्या नियमाभोवती फिरणाऱ्या आरटीओ, पोलिसांना उसाची ओव्हरलोड वाहने का दिसत नाहीत? मागील वर्षभरात २०० हून अधिक अपघात झाले आहेत. त्यात कारखान्यांच्या हंगामाच्या काळात झालेल्या अपघातांची संख्याही लक्षणीय असली तरी त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास झालेला नाही.