sugarcane rate agitation
sakal
कऱ्हाड - ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर पुणे-बंगळूर महामार्ग रोखून सुरू असलेल्या आंदोलनाची दिशा बदलत आता साखर कारखाने बंद करण्याची रणनीती संघटनेने आखली आहे.