esakal | ऊसतोडणी मजुरीचे दर आवाक्याबाहेर; ट्रॅक्टर वाहतूकदारांची वाढली डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

satara

ऊसतोडणी मजुरीचे दर आवाक्याबाहेर; ट्रॅक्टर वाहतूकदारांची वाढली डोकेदुखी

sakal_logo
By
- अमोल जाधव

रेठरे बुद्रुक : साखर (Suger) कारखान्यांचे (Company) पुढील महिन्यात गळीत हंगाम सुरू होणार आहे. चार वर्षांपासून मजूर तुटवडा भासत आहे. त्याचा फायदा उठवत काही ऊसतोड मजूर मात्र, तोडणी वाहतूकदारांची कोंडी करताना दिसत आहेत. एका कोयत्यासाठी दीड लाखापर्यंत मजुरी घेतली जात आहे. तोडणी वाहतूकदारांकडून मजूर अवाजवी कोयता उचल घेत आहेत. त्यामुळे वाहतूकदारांची मोठी अडचण झाली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे.

हेही वाचा: सलग दोन आठवड्यानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर

हंगाम तोंडावर आल्याने कारखान्याशी संबंधित सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. हंगामात ऊसतोडणी कामगार व ऊसपुरवठा करणारी यंत्रणा महत्त्वाचे दुवे मानले जातात. गेल्या अनेक वर्षांपासून तोडणी मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. गत वर्षभरापासून या समस्येने रौद्ररूप धारण केले आहे. शेतीत ऊस हे मुख्य पीक शेतकरी घेतात. उसाबरोबर हंगामी पिकातून उत्पन्न घेताना शेतीपूरक व्यवसाय सांभाळत आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टरद्वारे ऊसतोडणी वाहतूक करण्याचा व्यवसाय काही शेतकरी करतात. ट्रॅक्टर वाहतूक करणाऱ्या व्यवसायिकांना तोडणी मजुरांचा आधार घ्यावा लागतो. आटपाडी, म्हसवड, जत, बीड, धुळे व नंदुरबार आदी भागांतून तोडणी मजूर येतात. याकामी त्यांना कोयता उचल द्यावी लागते. या प्रक्रियेत साखर कारखानदारांनी अलीकडे सावध पवित्रा घेत वाहतूकदारांना याकामी उचल देत मजुरांशी थेट होणारा व्यवहार कमी केला आहे. ट्रॅक्टर मालकांना कारखाने प्रतिटोळी चार ते पाच लाख रुपये देत आहेत. मात्र, तोडणी मजूर ट्रॅक्टर मालकांची अडवणूक करत अवाजवी उचल मागत आहेत.

हेही वाचा: ''भाऊ जेवण करून जा, गाडी मागू नकोस!'' पेट्रोल, डिझेलचे दर कारणीभूत; नात्यांवर परिणाम

प्रतिटोळीस ७ ते १५ लाख रुपयांपर्यंत उचल

दरम्यान, आजमितीला प्रतिटोळीस सात लाखांपासून १५ लाख रुपयांपर्यंत उचल द्याव्या लागत आहेत. मजूर तुटवड्यामुळे वाहतूकदारांना जोखीम घेऊन हा व्यवहार करावा लागत आहे. कोयता उचलीचे दर गगनाला भिडले असल्याने वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसणार आहे.

loading image
go to top