esakal | 'कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा, मग कळेल साताऱ्यात काय चाललंय ते' I Satara Election
sakal

बोलून बातमी शोधा

Suhas Rajeshirke

कोरोना महामारीत तुम्ही सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावले, हे सगळ्या जनतेला माहिती आहे.

'कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा, मग कळेल साताऱ्यात काय चाललंय ते'

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोना (Coronavirus) कालावधीत आम्‍ही स्‍वत: जनतेची काळजी घेत फिरत होतो. पालिकेत (Satara Municipal Election) सत्ता असतानाही तुम्ही साधे एक आयसोलेशन सेंटर सुरू करू शकला नाहीत. तुमचे वागणे ‘नाव मोठे अन् लक्षण खोटे,’ या प्रकारातील असल्‍याची टीका विरोधी पक्षनेते अशोक मोने (Opposition Leader Ashok Mone) यांनी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के (Suhas Rajeshirke) यांच्यावर केली. कुंभकर्णी झोपेतून जागे व्हा मग कळेल, साताऱ्यात काय चाललंय ते, असा टोलाही मोने यांनी राजेशिर्के यांना पत्रकाद्वारे लगावला आहे.

पत्रकात म्‍हटले आहे, की कोरोना महामारीत तुम्ही सत्ताधाऱ्यांनी काय दिवे लावले, हे सगळ्या जनतेला माहिती आहे. उपनगराध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर शिर्के तुम्ही कुंभकर्णी झोपेत गेलात. अजूनही तुम्हाला जाग आलेली नाही. कोण चमकोगिरी करतंय आणि कोण सातारकरांसाठी पळतंय, हे सगळं सातारकर उघड्या डोळ्यांनी पाहात आहेत. निवडणूक जवळ आल्याने केवळ सत्तेच्या हव्यासापोटी आता बॅनरबाजी करून सातारकरांना भुलवायचा नेहमीचा तुमचा डाव सुरू झाला आहे. ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ हा तुमचा अजेंडा सातारकरांनी पुरता ओळखला आहे. राजेशिर्के नाव लावणाऱ्या सुहास यांना स्वतःचा वॉर्ड कुठे आणि कसा आहे हे तरी माहिती आहे का? असा सवालही मोने यांनी पत्रकाद्वारे राजेशिर्के यांना विचारला आहे.

हेही वाचा: भाजपच्या राजेंविरोधात राष्ट्रवादी मैदानात

loading image
go to top