सहा महिन्यांपूर्वीच पत्नी माहेरी; सासरी परत येत नसल्याने पतीची आत्महत्या

भद्रेश भाटे
Friday, 20 November 2020

प्रमोद याने सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेतला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

वाई (जि. सातारा) : येथील धर्मपुरी पेठेतील प्रमोद सुरेश ओसवाल (वय 34) यांनी घरगुती कारणावरून गुरुवारी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. 

याबाबत सराफ व्यापारी महेश ओसवाल यांनी पोलिसात माहिती दिली आहे. त्यानुसार त्यांचा भाऊ प्रमोद याने गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला गळफास घेतला. त्यास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सहा महिन्यांपूर्वी माहेरी गेलेली पत्नी परत येत नाही. त्यामुळे नैराश्‍यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्‍यता फिर्यादीत नमूद केली आहे. अधिक तपास हवालदार माने करीत आहेत. 

खावली, उंब्रज, सनपानेतील फरारी गुन्हेगार अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide Of A Merchant At Wai Satara News