Taratlekar Leads, Sujata Jadhav Bags Fisheries Excellence AwardSakal
सातारा
Excellent fishing: ‘उत्कृष्ट मत्स्य पालन’चा सुजाता जाधव यांना पुरस्कार; पुणे विभागात तारळेकरांचा डंका
सुजाता जाधव या आपल्या कुटुंबासह तारळी धरणाच्या जलाशयात बिग फिश फॉर्म नावाचे मत्स्य पालन (केज कल्चर) प्रकल्प चालवतात. गेले सात- आठ वर्षे त्या या प्रकल्प यशस्वीपणे हाताळत असून, त्यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मत्स्य व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्यात गौरव करण्यात आला.
तारळे : राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त पुण्यात मत्स्य व्यावसायिकांचा सन्मान सोहळा नुकताच झाला. या सोहळ्यात डांगिष्टेवाडी (तारळे, ता. पाटण) येथील सुजाता नवनाथ जाधव यांचा मत्स्य पालन प्रकल्पाला प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.