esakal | पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही
sakal

बोलून बातमी शोधा

पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांशी सातारा जिल्हा एकनिष्ठ असून, हा जिल्हा त्यांचेच नेतृत्व मानतो. पृथ्वीराजबाबा यांच्याबद्दल अवमानकारक विधाने करून या जिल्ह्याच्या सुपुत्राची उंची मोजण्याचे किंवा त्यांची अप्रतिष्ठा करण्याचे धाडस सुनील केदार यांनी करू नये.

पृथ्वीराजबाबांचा अवमान कदापि खपवून घेणार नाही

sakal_logo
By
सलीम आत्तार

पुसेगाव : अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या कार्यकारी समितीच्या काल झालेल्या कामकाजाचा निर्णय बाहेर येण्याअगोदरच मंत्री सुनील केदार यांनी आरोप करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे अपरिपक्व वक्तव्य केले. त्याचा जिल्हा कॉंग्रेस समितीतर्फे जाहीर निषेध करण्यात आला. 

पृथ्वीराजबाबांची अप्रतिष्ठा करण्याचे धाडस सुनील केदार यांनी करू नये, अन्यथा जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कार्याध्यक्ष अॅड. विजयराव कणसे, उपाध्यक्ष बाळासाहेब कदम, अॅड. जयवंतराव केंजळे, अशोकराव गोडसे, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश फाळके, मानाजीराव घाडगे, ज्येष्ठ नेते अजित पाटील-चिखलीकर, जितेंद्र भोसले, डॉ. विवेक देशमुख, युवक कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष मनोहर बर्गे, दरे येथील सरपंच आनंदराव जाधव व पदाधिकाऱ्यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिला आहे.

जिल्ह्याबाहेरील जैव वैद्यकीय कचरा विनापरवानगी स्वीकारत नाही : सागर जाधव
 
दिल्ली येथे अखिल भारतीय कॉंग्रेस समितीच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत झालेला निर्णय बाहेर येण्याआधीच मंत्री सुनील केदार यांनी पृथ्वीराजबाबा यांना राज्यात फिरू देणार नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव म्हणाले, पृथ्वीराजबाबा यांची गांधी घराण्यावरील गेल्या तीन पिढ्यांची निष्ठा सुनील केदार यांना माहिती नसावी. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधींपासून पृथ्वीराजबाबा यांची या घराण्यावर निष्ठा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्हा हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा आहे. 

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; वडूजला पदे रिक्त 

कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी तसेच राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विचारांशी सातारा जिल्हा एकनिष्ठ असून, हा जिल्हा त्यांचेच नेतृत्व मानतो. पृथ्वीराजबाबा यांच्याबद्दल अवमानकारक विधाने करून या जिल्ह्याच्या सुपुत्राची उंची मोजण्याचे किंवा त्यांची अप्रतिष्ठा करण्याचे धाडस सुनील केदार यांनी करू नये, अन्यथा या जिल्ह्यातील कॉंग्रेसचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील, हे लक्षात ठेवावे, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

संपादन : बाऴकृष्ण मधाळे

loading image
go to top