esakal | पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; वडूजला पदे रिक्त
sakal

बोलून बातमी शोधा

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; वडूजला पदे रिक्त

सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांतील पशुसंवर्धन विभागातील अधिकारी यांची बदली झाल्याने प्रभारी अधिकारी यांना कारभार पहावा लागत आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या; वडूजला पदे रिक्त

sakal_logo
By
आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : खटाव पंचायत समितीचा पशुसंवर्धन विभाग, तसेच राज्य शासनाच्या वडूज येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामुळे गोपूज व पुसेगाव या दोन दवाखान्याचा कारभार पाहून भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातील शस्त्रक्रियेसाठी नवनियुक्त अधिकारी कितपत वेळ देऊ शकणार असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

पंचायत समितीचे तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दुर्गादास उंडेगावकर यांची आपटाळे (ता. जुन्नर जि. पुणे) येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाईचे डॉ. सुनील देशपांडे यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. उंडेगावकर यांनी चार्ज सोडून पुण्याला जाण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांच्या जागेवर डॉ. देशपांडे हजर झाले नाहीत. वडगाव येथील पशुवैद्यकीय केंद्राचे डॉ. कटरे यांच्याकडे तात्पुरता चार्ज देण्यात आला आहे. वडूज येथील तालुका लघू सर्व पशुचिकित्सालयाचे अधीक्षक डॉ. लियाकत शेख महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा चार्ज डॉ. नितीन खाडे यांच्याकडे देण्यात आला होता.

डॉक्‍टर, इतकं खरं बोलायचं नसतं हो...! 
 
आता डॉ. खाडे यांचीही कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्‍यात बदली झाली आहे. येथील चार्ज डॉ. संन्याल तासगावकर यांच्याकडे देण्यात आला आहे. पुसेसावळी येथील डॉ. सचिन हागवणे यांची पाटण तालुक्‍यात बदली झाली आहे. पुसेगाव येथील डॉ. ए. डी. राजे यांची बदली आसू (ता. फलटण) येथे झाली आहे. त्यांचा चार्ज सध्या गोपूज येथील दवाखान्याचे डॉ. सागर दोलताडे यांच्याकडे सोपविला आहे.

पावसामुळे महामार्गाचा दर्जा झाला उघड!, मोठ-मोठे खड्डे पडून दुरवस्था

याशिवाय औंध येथील डॉ. यु. के. महामुनी सेवानिवृत्त झाले आहेत. चोराडे येथील दवाखान्याचे डॉ. हणमंत जाधव यांच्याकडे औंधचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. डॉ. जाधव हे दोन्ही गावांना प्रत्येकी तीन दिवस सेवा देत आहेत. औंध येथे वडूज पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी डॉ. देवानंद खरात यांना तीन दिवस कार्यरत राहण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. 

शस्त्रक्रियेवेळी अडचण 

वडूजचे डॉ. नितीन खाडे, खटाव येथील डॉ. श्‍याम कदम हे दोघे जनावरांच्या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासंदर्भात पारंगत होते. आता या दोघांच्या बदल्या झाल्या आहेत. गोपूज येथील डॉ. दोलताडे शस्त्रक्रियेचे काम करू शकतात. मात्र, गोपूज व पुसेगाव या दोन दवाखान्याचा कारभार पाहून भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असणाऱ्या तालुक्‍याच्या कानाकोपऱ्यातील शस्त्रक्रियेसाठी कितपत वेळ देऊ शकणार हा भाग आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top