'स्ट्रीटलाइटचे वीजबिल सरकारनेच भरावे, अन्यथा आंदोलन करू'

Streetlight
Streetlightesakal

कऱ्हाड (सातारा) : स्ट्रीटलाइटचे (Streetlight) वीजबिल (Electricity bill) थकल्याने महावितरणने (MSEDCL) गावोगावी अंधार केला आहे. ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचे अन्यायी आदेश काढले आहेत. तो तातडीने रद्द करून सरकारनेच बिल भरावे, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सुपने-तांबवे विभागातील ग्रामपंचायतींनी सभापती प्रणव ताटे (Speaker Pranav Tate) यांच्याकडे निवेदनाव्दारे दिला. (Supne-Tambave Gram Panchayat Demands Payment Of Street Light Bill By The Government Satara Marathi News)

Summary

स्ट्रीटलाइटचे वीजबिल थकल्याने महावितरणने गावोगावी अंधार केला आहे. ग्रामपंचायतींच्या विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचे अन्यायी आदेश काढले आहेत.

स्ट्रीटलाइटचे वीजबिल शासन भर होते. त्यासाठी दिवाबत्ती कर वसूल केला जातो. मात्र, सरकारच्या (maharashtra government) अन्यायी कारभारामुळे गावोगावी अंधार झाला आहे. सरकारने लॉकडाउन काळातील बिले माफ करण्याचे आश्वासन पाळले नाही. कोरोना (coronavirus) काळतही लोकांची कनेक्शन तोडून महावितरणने अन्याय केला. ग्रामपंचायतींना विकासकामांच्या निधीतून बिले भरण्याचे अन्यायी आदेश काढले आहेत. त्याचा ग्रामीण भागाच्या विकासावर परिणाम होणार आहे.

Streetlight
सरकार ग्रामपंचायतींना 'अपंग' तर करत नाही ना?

सरकारने ताबडतोब पथदिव्यांची वीजबिले भरून स्ट्रीटलाइट सुरू कराव्यात, अशी मागणी सभापती ताटे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे. सरकारने वीजबिल न भरल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदाव्दारे शिवाजी पाटील, वसंतगडचे उपसरपंच ॲड. अमित नलवडे, पाडळीचे बाबासाहेब कळके, तांबवेचे माजी सरपंच जावेद मुल्ला, माजी उपसरपंच रवींद्र ताटे, पश्चिम सुपने उपसरपंच अर्जुन कळंबे, आबाईनगरचे उपसरपंच अशोक माने, विवेक कुराडे, सचिन महाडिक, राजेंद्र जाधव, अनिल साळुंखे यांनी दिला आहे.

Supne-Tambave Gram Panchayat Demands Payment Of Street Light Bill By The Government Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com