कऱ्हाड - शहर परिसरात अवैध पध्दतीने वाहनांत घरगुती गॅस भरून देणाऱ्या दोन वेगवेगळ्या अड्डयावर छापा टाकून पुरवठा विभागाने तब्बल २८ सिंलेडरच्या टाक्या जप्त केल्या आहेत. बनवडी फाट्यावरील अड्ड्याचालक फरार झाला होता. त्यावेळी छापा टाकताना गोदामाचे कुलूप तोडून पुरवठा विभागाने कारवाई केली. त्यात २५ सिलेंडर जप्त झाले.