

Supriya Adke MPSC Success Story From Rural School To State Tax Inspector Through Dedication Hard Work And Determination
sakal
-सुधीर जाधव
सातारा : ग्रामीण भागात शिक्षण घेताना मनाशी बाळगलेले प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न अखेर साकारले. सातत्यपूर्ण अभ्यास, योग्य नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर सुप्रिया संपत आडके यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) स्पर्धा परीक्षेत यश मिळवत राज्य कर निरीक्षकपदाला गवसणी घातली. त्यांच्या या यशामुळे दुधेबावी परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.