

Supriya Owhal Overcomes Adversity to Become a Teacher Secures Second Rank in Satara Through Pavitra Portal Selection
esakal
सातारा : प्रतिकूल परिस्थिती, संसाराची जबाबदारी आणि नोकरीचे आव्हान... या साऱ्यांवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर प्रतापसिंहनगरमधील सुप्रिया ओव्हाळ यांनी शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले आहे. पवित्र पोर्टल निवड चाचणीत त्यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळवत आपल्या मेहनतीला यशाची पावती मिळवून दिली.