'आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळाबर लढणार'; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

'आगामी निवडणुका स्वबळावर लढाव्यात, सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन काँग्रेसची ताकद दाखवून द्यावी.'

'आगामी निवडणुका काँग्रेस स्वबळाबर लढणार'

sakal_logo
By
राजेंद्र वाघ

कोरेगाव (सातारा) : जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (Panchayat Committee), नगरपंचायतीवर काँग्रेसची (Congress) सत्ता आणण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत जावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव (Suresh Jadhav) यांनी येथे केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून महागाईविरोधात जनआंदोलन करण्याची तयारी करणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधीच्या जयंतीनिमित्त पक्षाच्या तालुका कार्यकारिणीची बैठक, नवनियुक्त कार्यकारिणीचा सत्कार डॉ. जाधव, कार्याध्यक्ष ॲड. विजयराव कणसे, तालुकाध्यक्ष ॲड. श्रीकांत चव्हाण, कार्याध्यक्ष मनोहर बर्गे, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ कुंभार, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांच्या उपस्थितीत येथे झाला. त्या वेळी डॉ. जाधव बोलत होते. बैठकीत आगामी पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी स्वबळाचा सूर उमटला. त्यावर डॉ. जाधव म्हणाले, ‘‘नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या लोकशाहीतल्या संस्थांवर काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी आपण सर्वांनी लोकांपर्यंत गेले पाहिजे.’’

हेही वाचा: आमदार शिंदे, मानकुमरे गट एकमेकांना भिडले

Congress

Congress

तालुकाध्यक्ष अॅड. श्रीकांत चव्हाण यांनी कोरेगावात उभारलेले पक्षाचे कार्यालय जिल्ह्यातील आदर्श कार्यालय आहे, अशा शब्दांत डॉ. जाधव यांनी कौतुक केले. काँग्रेसने पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढाव्यात, सर्वधर्मीयांना बरोबर घेऊन काँग्रेसची ताकद दाखवून द्यावी, कार्यकर्त्यांनी गावागावांत बूथनिहाय पक्ष बांधणीवर भर देऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, अशा स्वरूपाची मते अॅड. कणसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश फाळके, सुनील भोसले, जगन्नाथ कुंभार, धैर्यशील सुपले यांनी व्यक्त केली. तालुकाध्यक्ष ॲड. चव्हाण यांनी स्वागत, कार्याध्यक्ष बर्गे यांनी प्रास्ताविक, संतोष शेलार यांनी सूत्रसंचालन केले. संतोष ढाणे यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'फडणवीस, चंद्रकांतदादांशी बोलूनच NCP मंत्र्यांना केलं मतदान'

loading image
go to top